Saturday, December 27, 2008

!!! आयुष्य !!!

आयुष्य असते जगण्यासाठी,

ते नसते दुस-यावर उधळण्यासाठी...


एकच तर गोष्ट आपली असते,

ती पण जर कुणी हिरावुन घेतली,

तर आपले जगणे काय कामाचे...


आयुष्याच्या प्रत्येक सुख दु:खातुन,

नवे काही शिकत जावे,

मागे वळुन न पहाता पुढे चालत जावे...


आयुष्याच्या एका उंबरठयावर,

हे सर्व पहायचेच आहे,

मग कशाला भिती बाळगुन,

पुढचे आयुष्य वाया घालवावे...


आयुष्य आहे जगण्यासाठी

ते जगत जावे...




कुणाल

Friday, December 26, 2008

मन

मन हे माझे

तुझ्याकडे मोकळे होते

फक्त शब्दांनीच नव्हे तर

डोळ्यांनीही सारं व्यक्त होते...

हे सांगु कि ते सांगु

असे सांगु कि तसे सांगु

ह्या विचारा शिवायच

ते नेहमी हलके होते...

मनातल्य तीव्र भावना पण तु

अलगद ओळखतेस

आणि उसळलेल्या लाटांनाही

हळुवार सावरतेस...

कुणाल