Saturday, December 27, 2008

!!! आयुष्य !!!

आयुष्य असते जगण्यासाठी,

ते नसते दुस-यावर उधळण्यासाठी...


एकच तर गोष्ट आपली असते,

ती पण जर कुणी हिरावुन घेतली,

तर आपले जगणे काय कामाचे...


आयुष्याच्या प्रत्येक सुख दु:खातुन,

नवे काही शिकत जावे,

मागे वळुन न पहाता पुढे चालत जावे...


आयुष्याच्या एका उंबरठयावर,

हे सर्व पहायचेच आहे,

मग कशाला भिती बाळगुन,

पुढचे आयुष्य वाया घालवावे...


आयुष्य आहे जगण्यासाठी

ते जगत जावे...




कुणाल

No comments: