Sunday, January 25, 2009

!!! प्रेम अंकुर !!!

तुला पाहिले व ह्या मनातील प्रेम अंकुर दरवळला.

तुला पाहिल्यावर जसे ह्या
शरीरात नव्याने जीव आल्यासारखे वाटले.

तुझ्याविना हे जीवन एक
निरागस रस्त्या सारखे होते.

पण तु माझ्या जगण्याला एक
नवी दिशा दिली.

व मला
जगण्याचा खरा आनंद कळला.

जगायच महत्त्व कळाले

दुस-याच्या सुखातच नव्हे तर दुखा:

पण त्याला साथ द्यायची
हे समजले...



कुणाल

!!! तुझा प्रियकर !!!

मला लोक नेहमीच विचारतात की तु कोण ?

माझे एकच उत्तर असते मी एक मनुष्य.

एक असा मनुष्य की ज्याचे हृदय तुझ्याकडे आहे.

आता तु म्हणशील मी तर ते मागीतले नव्हते.

पण माझे उत्तर एकच असेन "प्रेम".

तु पण माझ्यावर प्रेम करुन

माझी ही रिकामी जागा भरुन काढ.

मग मी लोकांना सांगेण,

मी तुझा "प्रियकर!!!".



कुणाल

!!! सावध हो !!!

माझ्या मनातील प्रेम पाखरा,
तु ह्या जगात एकटा आहेस.

तु आता भरारी मारण्यास तयार आहेस,
पण सावध हो... सावध हो...

तु उडुन ज्या वृक्षावर बसशील,
कदाचीत त्या वृक्षाला तुझा सहवास नको असेल.

पण तु निराश होऊ नकोस,
कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कलपवृक्ष नसते.

तु एवढी हिंमत गोळा कर की,
तु समोरच्या वृक्षाच्या आनंदात आनंदी होशील.

कधीतरी ते वृक्ष आपले होईल
ह्या आशेवर जगत जा...


कुणाल