आयुष्य असते जगण्यासाठी,ते नसते दुस-यावर उधळण्यासाठी...एकच तर गोष्ट आपली असते,ती पण जर कुणी हिरावुन घेतली,तर आपले जगणे काय कामाचे...आयुष्याच्या प्रत्येक सुख दु:खातुन,नवे काही शिकत जावे,मागे वळुन न पहाता पुढे चालत जावे...आयुष्याच्या एका उंबरठयावर,हे सर्व पहायचेच आहे,मग कशाला भिती बाळगुन,पुढचे आयुष्य वाया घालवावे...आयुष्य आहे जगण्यासाठीते जगत जावे...कुणाल
आयुष्य जगत असताना
आपण हे नेहमी विसरतो
कि आयुष्य पूर्ण जगता येत नाही
ते सुख दु:खाच्य़ छोटया भागात विखुरलेले असते
आयुष्यात जेव्ह्म सुखाची एक झुळुक
आपल्या जगण्याच्या गतिला वाढवत असते
तेव्ह्म दु:खाचा एक क्षण
आपल्या जगण्याला एक नवी दिशा देऊन जातो
असे गति व क्षणात जगत असताना
कुठेतरी स्थिरावयाचे असते
आणि हे स्थैर्य लग्न ही गोष्ट घेऊण येते
कारण आयुष्यात स्थैर्य येणे हे खूप महत्वाचे असते...
-कुणाल